राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, सोबतच लॉकडाऊनची मुदत देखील वाढतेय, अनेक नागरिकांना त्याचा त्रास होतोय, अनेकांना हजारो अडचणी येत आहेत, त्यामुळे काही गोष्टी राज्यात खबरदारी घेऊन सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे, राज्यात 3 टप्प्यात अनेक गोष्टी सुरू होणार आहेत, त्या कोणत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हमधले मुख्य 40 मुद्दे आपण पाहाणार आहोत.
- राज्यातल्या अनेक गोष्टी उघड झाप करायची नाही, जी गोष्ट सुरूवात करू, ती कायमस्वरुपी राहिल.
- संपुर्ण महाराष्ट्रात 3 तारखेपासून हातपाय हालवायला सुरूवात करणार
- जिथे गर्दी होणार, त्या कार्यक्रमांना, जीमला परवाणगी नाही, मात्र मैदानात जाऊन व्यायाम करणे, मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकला परवाणगी
- बाहेर पडल्यानंतर अनेक आत्पेष्ट आणि मित्र भेटतील, मात्र एकमेकांत अंतर ठेवा.
- 5 तारखेपासून अनेक दुकाने सुरू होणार
- 8 तारखेपासून कार्यालये सुरू होणार
- 8 तारखेपासून 10 टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन ऑफिसेस सुरू होतील
- काही काळ अशीच रुग्णांची संख्या वाढेल, मात्र त्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे
- ज्यांना गरज नाही, त्यांनी घराबाहेर पडू नका. वृध्द, अनेक आजार असलेले नागरिक त्यांनी घरीच राहा
- घरातून बाहेर पडणाऱ्यांनीही काळजी घ्यावी, की बाहेरून आल्यानंतर आपल्या घरातल्यांच्या संपर्कातच येणार नाही.
- पावसाळा येत आहे, तुम्हाला काही आजारांची लक्षण अढळली, तर तात्काळ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
- महाराष्ट्रात आतापर्यंत 65 हजार रुग्णांना कोरोनाची लागण, तर त्यातील 28 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली.
- आज मुंबईत 34 हजार रुग्ण आहेत, त्यातील 24 हजार हे ठणठणीत आहेत, ज्यांना कोणत्याच औषधांची गरज नाही.
- सरकारला विरोध करणाऱ्यांनी एकदा हे आकडे पाहावेत.
- आपलीच माणसं महाराष्ट्राला बदणाम करण्याचं काम करत आहेत.
- पुढच्या रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र मिळणार
- वृत्तपत्र विक्रेत्यांनीही स्वत: काळजी घ्यावी, सोबत मास्क, हॅंड सॅनिटायझर ठेवावे.
- पहाटे 5 ते सायंकाळी 7 पर्यंत अनेक लोक व्यायामाच्या उद्देशाने मोकळ्या मैदानात जाऊ शकतात.
- सध्या 1200 रुग्णांची परिस्थिती चिंताजनक
- महाराष्ट्रात 77 चाचणी केंद्रे आहेत, येत्या काही दिवसांत 100 चाचणी केंद्रे महाराष्ट्रात उभा राहातील
- टेस्टची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे आवाहन
- महाराष्ट्रात अडीच लाख बेड्सची सुविधा आहे, त्यातील 25 हजार आयसोलेशनचे बेड्स आहेत.
- आयसीयूचे बेड्स 8 हजारहून अधिक आहेत.
- महाराष्ट्र उपचार, सुविधा आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून वारंवार काम करत आहे.
- मृत्यूदर आपल्याला अजूनही खाली आणायचा आहे.
- अंगावर दुखणं काढू नका, वेळेत डॉक्टरांशी संपर्क करा, उपचार करून घ्या
- मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टर सज्ज आहेत, पण पेशंट गरजेचे आहेत, ते वेळेत येणे गरजेचे आहे
- आतापर्यंत 16 लाखहून अधीक लोकांना रेल्वे आणि बसच्या माध्यमातून परराज्यात सोडलं
- पियुष गोयलांना धन्यवाद, त्यांच्यामुळे साडे 11 लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडलं
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 85 कोटीहून अधिक खर्च या प्रवास योजनेवर केला आहे
- आपण 32 लाख 77 हजारून अधिक लोकांनी आतापर्यंत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला
- तातडीने परिक्षा घेण्याची ही परिस्थिती नाही
- अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापेक्षा सगळ्या सेमिस्टरची सरासरी काढायची आणि त्यांचा निकाल देण्यात येणार
- अनेक विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की विद्यापीठाने दिलेल्या मार्कांपेक्षा त्यांना जास्त मार्क मिळू शकतात, तर त्यांच्यासाठीही सुविधा देऊ
- काही देशांमध्ये सुरू केलेल्या शाळा मला परत बंद करायचं नाहीत
- मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप, टॅब अशा माध्यमातून काही शिक्षण सुरू करू शकतो का, यावर विचार सुरू आहे.
- जिथे गरज आहे, तिथे ऑनलाईन आणि जिथे गरज आहे तिथे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण सुरू करू
- फिल्ड रुग्णालये मुंबईत उभे आहेत, तशीच आणखी उभे करू
- इथूनपुढे आरोग्य आणि शिक्षण विभागावर लक्ष दिलं जाईल.
- अनेक ठिकाणी जिथे मोकळी मैदाने आहेत, जिथे मोठे कार्यक्रम होतात, तिथे आरोग्य सुविधादेखील उपलब्ध करू, जेणेकरून पुढील 2 ते 3 दिवसात तिथे रुग्णालये उभे करता येईल
- खबरदारी आणि जबाबदारी सोबत घेऊन पुढे जायचं आहे.
- जनता सोबत असताना, सरकार पडणार नाहीच
- मिशन बिगीन अगेनला सुरूवात


0 Comments